Friday, September 11, 2026
Homeशहरत्या नराधमाला फासावर लटकवून पिडीत चिमूरडीला न्याय द्या-संघर्ष समिती

त्या नराधमाला फासावर लटकवून पिडीत चिमूरडीला न्याय द्या-संघर्ष समिती

बीड, दि. ०६ [प्रतिनिधी] :- बारा ज्योतिर्लिंगा पैकी एक असलेल्या परळी वैजयनाथ येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. अवघ्या ४ वर्षाच्या चिमूरडीवर शेख सजन नावाच्या मुस्लिम समाजाच्या नराधमाने भर दिवसा अत्याचार केला.

माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेच्या निषेधार्थ परळी मध्ये हिंदू समाजाचा मोर्चा ही निघाला. पण फक्त निषेध करून थांबणे अयोग्य असून त्या नराधमाला फासावर लटकवून पिडीत चिमूरडीला न्याय द्या, अशी न्यायिक मागणी आर्य वैश्य संघर्ष समिती, महाराष्ट्र च्या वतीने करण्यात येत आहे. संघर्ष समितीच्या वतीने या बाबत राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री यांना निवेदने देण्यात आली. तसेच याबाबतचे एक निवेदन आर्य वैश्य संघर्ष समिती, बीड च्या वतीने तहसीलदार, परळी यांना ही देण्यात आले. यावेळी संघर्ष समिती, बीडचे जिल्हाध्यक्ष राजेश कौलवार, विवेक पारसेवार, रमेश कोमावार, सतीश चौलवार आदींची उपस्थिती होती.

 

हेही वाचा

लक्षवेधी