Monday, June 8, 2026
Homeप्रादेशिकमुनगंटीवारांचा वाढदिवस पर्यावरणाच्या दृष्टीने वरदान

मुनगंटीवारांचा वाढदिवस पर्यावरणाच्या दृष्टीने वरदान

'जनतेचे आशीर्वाद हे निस्वार्थ भावनेने केलेल्या जनसेवेचे फलित'

चंद्रपूर, दि. २७ [प्रतिनिधी] :- महाराष्ट्र राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री, आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा वाढदिवस ३० जुलै रोजी आहे. पण चांदा ते बांदा अभ्यासू, संवेदनशील, संयमी, उत्कृष्ट वक्ता, अटलबिहारी भाजपचा वारसा नसानसांत भिनलेला जनसेवक, जननायक अशी ओळख असलेल्या सुधीर मुनगंटीवार यांचा वाढदिवस आठ-दहा दिवस आधीपासून साजरा होण्याची जणू प्रथाच पडली आहे. महत्वाचे म्हणजे त्यांचा हा वाढदिवस सप्ताह ‘सांस्कृतिक कार्यक्रम’ असे गोंडस बिरुद लावून नाचगाण्याच्या कार्यक्रमाने नाहीतर वृक्षा रोपणाच्या उपक्रमाने, रक्तदान शिबीराने, गरजवंतांना करण्यात येणाऱ्या मदतीने साजरा होतो.

मागील काही वर्षांपासून सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात मोठ्या प्रमाणात वृक्षा रोपण, वृक्ष संवर्धन करण्यात येत असल्यामुळे मुनगंटीवार यांचा वाढदिवस पर्यावरणाच्या दृष्टीने वरदान ठरत असल्याचे मत निसर्ग प्रेमी व्यक्त करत आहेत. यास कारण ही तसेच असून सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित २०१६ साली छत्रपती संभाजीनगर येथील देवानगरी भागात उकिरड्याच्या जागेचे रूपांतर उद्यानात करत साकारण्यात आलेले ‘आर्य वैश्य शतपावली उद्यान’ हे दुर्मिळ जातीच्या वृक्ष-वेलिंचे उद्यान म्हणून बहरत आहे. हे उद्यान मधमाशा, फुलपाखरे, खारुताई, पक्षी यांच्यासाठी शहरी भागातील नैसर्गिक आधीवास ठरत आहे. यामुळेच मुनगंटीवार यांचा वाढदिवस पर्यावरण वर्धक ठरत असल्याचे मत निसर्ग मित्र मांडतांना दिसून येतात.

मुनगंटीवार यांच्या वाढदिवस जनसेवा सप्ताहाला आज चंद्रपूर परिसरातील जेष्ठांना अन्नदान व दैनंदीन उपयोगाच्या वस्तु भेट देवून सुरुवात झाली. ओबीसी आघाडीचे अध्यक्ष अमोल झाडे यांनी मुनगंटीवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज विसापुर (जि. चंद्रपूर) येथील मातोश्री वृद्धाश्रमात जेष्ठांसाठी अन्नदान व भेटवस्तू वितरणाच्या कार्यक्रमाने लोकसेवेच्या उपक्रमाची सुरूवात केली.

यावेळी जेष्ठ माता-भगिनींनी मुनगंटीवार यांचे औक्षण केले. त्यांना शुभाशीर्वाद दिले. सुख-दुखात देवदूत म्हणून नेहमीच मदतीला उभ्या राहणाऱ्या मुनगंटीवारांप्रती जनमनात कीती प्रेम आहे, आपुलकी आहे, आदर आहे, ते या प्रसंगातून आपसूक स्पष्ट होत होते. वयोवृद्ध माता-भगिनी आपल्या मूला प्रमाणे, नातवा प्रमाणे मुनगंटीवार यांचे औक्षण करत त्यांना शुभाशीष देत त्यांच्या डोक्यावरून मायेचा हात फिरवत होते. त्यांचे हे प्रेम पाहून आनंदाने मन भरून आलेल्या मुनगंटीवार यांनी, “जनता जणार्धनाचे हे प्रेम म्हणजे, निस्वार्थ भावनेने केलेल्या राजकारणरूपी समाजसेवेचे फलित होय. हे प्रेम मिळण्यासाठी पुण्य लागते, हे ईश्वरीय वरदान हे माझं खरोखरच भाग्य आहे. ज्येष्ठांच्या डोळ्यांतील प्रेम आणि आशिर्वादांनी मन गहिवरून आलं” अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.

राजकीय नेत्यांचा वाढदिवस म्हटले की, गौतमी पाटीलचा धांगडधींगा, तलवारीने केक कापणे असे नको ते प्रकार राज्यात सुरू झाले आहेत. पण सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा वाढदिवस दरवर्षी जनसामान्यांच्या सेवेसाठी समर्पित उपक्रमांनी साजरा होतो आणि तो एक सामाजिक सोहळा ठरतो. आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि गरजूंच्या मदतीसारख्या विविध क्षेत्रांतील उपक्रमांच्या माध्यमातून राज्यभरात हा दिवस जनहितार्थ साजरा केला जातो. ही परंपरा त्यांच्या लोकाभिमुख कार्यपद्धती, सामाजिक भान आणि सेवाभावाचे जिवंत प्रतीक ठरत आहे.

अमोल झाडे आणि त्यांच्या मित्र परिवाराने जेष्ठांप्रती आदरभाव व्यक्त करत अन्नदान आणि दैनंदीन उपयोगांच्या वस्तूंचे वाटप करण्याच्या पुण्यकर्माने वाढदिवस सप्ताहास केलेल्या प्रारंभाबद्दल आमदार मुनगंटीवार यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले. याप्रसंगी भाजपाचे ज्येष्ठ नेते चंदनसिंग चंदेल, शहराध्यक्ष रणंजय सिंग, ओबीसी आघाडीचे अध्यक्ष अमोल मोरे, अजय जयस्वाल, विद्याताई देवाळकर, अमोल झाडे, किशोर पंदीलवार, सतीश कनकम, सरिता कनकम, देवा वाटकर, पिंटू देऊळकर,किशोर मोहूर्ले, जयश्री मोहूर्ले, संदीप पोडे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

 

हेही वाचा

लक्षवेधी