Friday, September 11, 2026
Homeशहर'लोकप्रतिनिधी नसून ही लोकांसाठी लढणाऱ्या, ड्रग्ज मुक्त समाजासाठी ड्रग्ज माफियांशी भिडणाऱ्या सरस्वती...

‘लोकप्रतिनिधी नसून ही लोकांसाठी लढणाऱ्या, ड्रग्ज मुक्त समाजासाठी ड्रग्ज माफियांशी भिडणाऱ्या सरस्वती ताईंना उमेदवारी द्या’

चंद्रपूरकरांची भाजप नेत्यांकडे मागणी

चंद्रपूर, दि. २५ [प्रतिनिधी] :- ऐतिहासिक, सांस्कृतिक चंद्रपूर नगरीचे पावित्र्य, महात्म्य अबाधित राखण्यासाठी, चंद्रपूरात वाढती नशाखोरी रोखण्यासाठी, युवक-युवतींना अमली पदार्थांच्या आहारी नेणाऱ्या ड्रग्ज माफियांना अटकाव घालण्यासाठी, महिलांच्या सुरक्षेसाठी, प्रभागाच्या विकासासाठी प्रभाग क्रमांक दोन मधून भारतीय राष्ट्रीय मानवाधिकार समितीच्या प्रदेश महिला अध्यक्षा, भाजपच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या सरस्वतीताई दास यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी प्रभाग क्रमांक एकच्या मतदारांकडून उत्स्फूर्तपणे करण्यात येत आहे.

प्रभाग क्रमांक एक च्या सजग मतदारांच्या वतीने याबाबत नुकतेच भाजप नेत्यांना निवेदन देण्यात आले आहे. त्या निवेदनात सरस्वतीताई दास यांनी चंद्रपूरात अमली पदार्थांच्या वाढत्या तस्करीला पोलिसांनी अटकाव घालावा म्हणून आपल्या जिवाची पर्वा न करता ड्रग्ज माफियांविरुद्ध जी मोहीम उघडली, पिडीत महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस प्रशासनाला धारेवर धरले, महानगरपालिकेची जागा बळकावू पाहणाऱ्यांविरुद्ध उठविलेला आवाज, प्रभागातील गोर-गरीब लोकांच्या अडीअडचणीला धावून जाण्याची त्यांची वृत्ती आदी बाबींचा उल्लेख करत त्यांना प्रभाग क्रमांक दोन मधून उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी भाजप नेत्यांकडे करण्यात आली आहे.

याबाबत बोलतांना त्यांनी, “मुझे अपने दादाका वारसा चलाना है. मै महिलांवो के हक के लीये, सुरक्षा के लीये, बिघडी सामाजिक व्यवस्था को दुरुस्त करने के लीये, सर्वसामान्य मतदातावो के सेवा, सुरक्षा और विकास के लीये, प्रभाग के विकास के लीये ये निवडणूक लढना चाहती हूं, अपनी ही नही बलकी हर गरीब की लढाई लड़ना मुझे आता है सही समय पर सही कदम उठाना भी जानती हूं मेरे परिवार की, मेरे बच्चो की चिंता नही मुझे भगवान है ऊनके लीये” अशा शब्दांत महानगरपालिका निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली.

सरस्वतीताई दास ह्यांचे कार्य चंद्रपूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक दोन पुरते मर्यादित नसून सामान्य जणांच्या मदतीला धावून जाण्याच्या, अन्याय होतो तिथे ऊभे राहण्याच्या, पीडिताला न्याय मिळवून देण्यासाठी शासन-प्रशासनाशी लढण्याच्या त्यांच्या स्वभावगुणामुळे, युवक-युवतींच्या कल्याणासाठी त्यांनी जीवावर उदार होऊन चक्क ड्रग्ज माफियांशी घेतलेल्या वैरामुळे त्या चंद्रपूरात धडाडीच्या समाजसेविका म्हणून ओळखल्या जातात. त्यामुळे भाजपच्या या निष्ठावान समाजसेवाव्रती सरस्वतीताई दास ह्यांना भाजपने उमेदवारी द्यावी, अशी मागणी मतदार स्वत: होऊन करत आहेत. त्यांच्या उमेदवारीसाठी मतदरांकडून भाजप नेत्यांना निवेदने देण्यात येत आहेत.

हेही वाचा

लक्षवेधी