Monday, June 8, 2026
Homeलेखबप्पा म्हणजे विकासाची 'टिकास'

बप्पा म्हणजे विकासाची ‘टिकास’

शहराच्या राजकारणात ‘बप्पा’ म्हणून ओळखल्या जाणारे माजी उप-महापौर संजय जोशी महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १९ मधून निवडणूक लढण्यास दक्ष असून त्यांनी मागील आठ-दहा दिवसांपासून प्रभागातील मतदारांच्या घरी जावून त्यांच्या गाठी-भेटी घेत ‘देशा प्रमाणे, राज्या प्रमाणे आपल्या शहराचा विकास साध्य करायचा असेल, तर भाजपच्या उमेदवारांना निवडून द्या….’ म्हणत भाजपचा प्रचार सुरू केला आहे.

या प्रचाराचाच भाग म्हणून ते प्रभाग १९ चा भाग असलेल्या शिवकृपा कॉलनी, पीडबल्युडी कॉलनी, राजगुरूनगर, इंद्रायणी कॉलनी, सेना नगर आदी भागात फिरत आहेत. सन २००८ च्या त्यांच्या ‘टर्म’ नंतर या भागाला अन्य नगरसेवक लाभले. पण तरी हा भाग आज ही माजी उप-महापौर संजय जोशी यांचा भाग म्हणूनच ओळखल्या जातो. यास कारण ही तसेच असून ते उप-महापौर पदावर असतांना त्यांना तर दूरच त्यांच्या दरवाज्याला ही गर्व, बडेजाव कधी शिवला नाही आणि ते नगरसेवक नसतांना ही त्यांचे दरवाजे मतदरांसाठी, परिसरातील लोकांसाठी कधी बंद झाले नाहीत.

परिसरातील कोणतेही सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम असोत, अडीअडचनी असोत ते त्यात सहभागी होत आले आहेत. आत्ता काही दिवसांपूर्वीच छत्रपती संभाजीनगर-परभणी या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाच्या अनुषंगाणे केंद्र शासनाच्या वतीने प्रसिद्धीस देण्यात आलेल्या राजपत्राचा विषय होता; या विषयाच्या अनुषंगाणे देवानगरी, स्वामी विवेकानंद नगर परिसरातील नागरिकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला. भीती निर्माण झाली. नागरिकांच्या मनातील हा संभ्रम, भीती दूर करण्यासाठी त्यांनी माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची एक बैठक परिसरातील व्हीनस अपार्टमेंट मध्ये आयोजित केली आणि त्यांच्या द्वारे नागरिकांना आश्वस्त करत या विषयातील संभ्रम दूर केला.

याच विषयात ईतर राजकारणी नागरिकांच्या मनातील भीतीचा फायदा घेत राजकीय पोळ्या भाजण्याचा विचार करत असतांना जोशी यांनी जी वास्तविकता आहे, ती सांगत या विषयाचा राजकीय फायदा घेण्याचा विचार ही केला नाही. समाजकारण करण्यासाठी राजकारण करायचे असते, राजकारण करण्यासाठी समाजकारण नाही, ह्याचे हे उत्तम उदाहरण. त्यांच्या स्वभाव धर्मातील समाजसेवेचे आणखीन एक उदाहरण म्हणजे, राजगुरू नगर, इंद्रायणी नगर, शिवकृपा कॉलनी, पीडब्ल्यूडी कॉलनी, सेना नगर आदी भागात महानगरपालिकेकडून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही.

त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून या भागातील महिला, पुरुष पिण्याचे पाणी देवानगरी भागातील नागरिकांकडून आणत. नळाचे पाणी येण्याच्या वेळेला देवानगरी भागातील ओळखीच्यांकडे जायचे आणि पिण्याची पाणी आणायचे, हे या भागातील अनेकांचे दैनंदिन जीवनातील महत्वाचे काम. काहीजण तर नळाचे पाणी येण्याच्या वेळेला थेट संजय जोशी यांच्या घरी जावून पिण्याचे पाणी भरत. याबाबीची दखल घेवून जोशी यांनी महानगरपालिका पाणिपूरवठा अधिकाऱ्यांना बोलून देवानगरी-प्रतापनगर रोडवर दोन सार्वजनिक नळ घेतले. ते आज ही सुरू आहेत. आज ही रेल्वे पटरी ते बीड बायपास या पट्यात राहणारे अनेक नागरिक त्या नळांवरून पिण्याची पाणी भरतात. तर काही लोकं महानगरपालिकेत पिण्याच्या टँकरचे पैसे भरून पिण्याचे पाणी उपलब्ध करून घेतात.

राजगुरू नगर, इंद्रायणी नगर, शिवकृपा कॉलनी, पीडब्ल्यूडी कॉलनी, सेना नगर आदी भागातील नागरिकांसाठी ही व्यवस्था ही उपलब्ध करून दिली ती संजय जोशी यांनीच….! यासाठी महानगरपालिका आयुक्तांना, अधिकाऱ्यांना, “जर तुम्ही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पाईप लाईन टाकून, नळ कनेक्शन देवून करून देऊ शकत नसाल तर किमान पिण्याच्या पाण्याचे टँकर देवून तरी पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवा….” असे ठणकावून सांगत त्यांनी या भागातील पिण्याच्या पाण्याची समस्या अस्थायी स्वरूपात का होईना सोडविली.

राजगुरू नगर, इंद्रायणी नगर, शिवकृपा कॉलनी, पीडब्ल्यूडी कॉलनी, सेना नगर, देवानगरी, बीड बायपास या परिसराला प्रतापनगर स्मशान भूमी या पर्यायी मार्गाने शहराला जोडले, ते संजय जोशी यांनीच…! त्यासाठी त्यांनी प्रतापनगर नाल्यावर प्रतापनगर स्मशानभूमी जवळ एक आणि त्या अलिकडे एक अशा दोन ठिकाणी पूलाचे काम करून घेतले. एवढेच नाहीतर प्रभाग क्रमांक १९ चा भाग असलेल्या राजगुरू नगर, इंद्रायणी नगर, शिवकृपा कॉलनी, पीडब्ल्यूडी कॉलनी, सेना नगर या भागात रस्त्यांच्या कामाची सुरुवात ही त्यांनीच केली.

महत्वाचे म्हणजे, ही आठवण त्यांनी नाही तर प्रभाग १९ मधील त्यांच्या उमेदवारीच्या प्रबळ दाव्याने आनंदी झालेल्या परिसरातील नागरिकांनी करून दिली, ही त्यांच्या राजकीय, सामाजिक कार्याची पावतीच म्हणावी. जुन्या देवानगरी-प्रतापनगर वार्डाचे नगरसेवक असतांना त्यांनी २००८ मध्ये काय-काय विकास कामे केलीत आणि त्यांना परत एकदा नगरसेवक पदाची जबाबदारी देणे का आवश्यक आहे, हे राजगुरू नगर, इंद्रायणी नगर, शिवकृपा कॉलनी, पीडब्ल्यूडी कॉलनी, सेना नगर, देवानगरी भागातील मतदार त्यांच्या कार्याबाबत सोशल मिडियावर उत्स्फूर्तपणे स्फुट लिखाण करून सांगत आहेत.

प्रभाग १९ चा भाग असलेल्या शिवकृपा कॉलनी परिसरातील रहिवासी डॉ. प्रा. प्रेम खडकीकर यांनी त्यांच्या बाबत लिहिलेला ‘गोष्ट एका रस्त्याची…’ हा लेख आणि त्यासोबत जोडलेले काही छायाचित्र सध्या चर्चेचा विषय आहे. या छायाचित्रा मध्ये परिसरातील नागरिक डॉ. प्रा. प्रेम खडकीकर यांच्यासह रामदास जीवनवाल, बाबूराव डीघोळे आदी दिसून येत असून हे छायाचित्रे २००८ ची असल्याचे कळते. सातारा परिसरातून शहरात ये-जा करण्यासाठी सध्या ज्या रस्त्याचा वापर प्रमुख रस्ता म्हणून होतो, त्या रस्त्याचे काम त्यांनी त्यावेळी केल्याचे या छायाचित्रातून स्पष्ट होते. यातून संजय जोशी यांची विकासाची दूरदृष्टी ही ठळकपणे लक्षात येत आहे.

आपण ज्यांचे प्रतिनिधीत्व करतो, त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असलो पाहिजे. त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण प्रामाणिक असलो पाहिजे, त्यांच्या समस्या सोडविण्यात काही तांत्रिक, प्रशासकीय अडचणी येत असतील, तर तिथे पर्यायी मार्ग काढून समस्या निराकरण केले पाहिजे हे मनाशी ठाणून त्यांनी या भागातील नागरिकांची, मतदारांची समाजसेवा कशी केली, याचे प्रमाण डॉ. प्रा. खडकीकर यांच्या लेखातून मिळत आहे. बप्पा म्हणजे, विकासाची ‘टिकास’ असे म्हणत या भागातील रहिवासी उत्स्फूर्तपणे त्यांचा प्रचार करतांना दिसून येत आहेत.

 

 

हेही वाचा

लक्षवेधी