Friday, September 11, 2026
Homeराजकीयसुधीर मुनगंटीवारांच्या प्रचारार्थ पवन कल्याण यांची जाहीर सभा

सुधीर मुनगंटीवारांच्या प्रचारार्थ पवन कल्याण यांची जाहीर सभा

बल्लारपूर, दि. १६ [प्रतिनिधी] :- बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपा प्रणित महायुतीचे अधिकृत उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ दि. १७, रविवार रोजी बल्लारपूर येथे आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री तसेच सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते पवन कल्याण यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली असून पवन कल्याण यांच्या जाहीर सभेने मुनगंटीवार यांच्या विजयावर शिक्का मोर्तब होणार असल्याच्या चर्चा या विधानसभा मतदारसंघात सुरू आहेत.

पवन कल्याण यांची जाहीर सभा बल्लारपूर येथील डब्ल्यूसीएल कॉलनी मैदानावर दि. १७, रविवार रोजी सकाळी ११.०० वाजता आयोजित करण्यात आली आहे. पवन कल्याण हे जनसेना पार्टीचे संस्थापक अध्यक्ष आहेत. आंध्रप्रदेशात एक दमदार युवा नेतृत्व म्हणून त्यांचा जसा लौकीक आहे, तसाच हिंदुत्वावादी म्हणून त्यांची एक वेगळीच ओळख दक्षीण भारतात आहे. हिंदुत्व आणि विकास या दोहोचा सुवर्ण मिलाप असलेल्या सुधीर मुनगंटीवार यांच्या सारखा तडफदार लोकनेता राज्याचा, देशाचा विकास अधिक गतीने करण्याच्या दृष्टीने राजकारणात असलाच पाहिजे, अशा व्यक्तिच्या पाठीशी असलेल्या जनाधारात विक्रमी वाढ झाली पाहिजे, या विचाराने पवन कल्याण बल्लारपूर विधानसभा मतदार संघात येत असल्याचे कळते. 

पवन कल्याण यांच्या प्रचार सभेबाबत प्रसार माध्यम प्रतिनिधींना सुधीर मुनगंटीवार यांच्या वतीने माहिती देतांना भाजप जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांनी, “सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली बल्लारपूर विधानसभेतील विकासाला अधिक गती प्राप्त झाली. बल्लारपूर विधानसभेचा चेहरामोहरा बदलला असून यापुढेही या विधानसभा मतदारसंघात सुधीर मुनगंटीवार अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वास आणणार आहेत. मुनगंटीवार यांना जाहीर पाठिंबा दर्शविण्याच्या दृष्टीने मुनगंटीवार यांच्या निवडणूक प्रचारार्थ आयोजित पवन कल्याण यांच्या सभेला नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे.” असे भाष्य केले.

हेही वाचा

लक्षवेधी