Monday, June 8, 2026
Homeप्रादेशिकआधी गुंडांकडून धमक्या आता पोलिसांकडून दबाव, भाजप जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे कडून सत्तेचा...

आधी गुंडांकडून धमक्या आता पोलिसांकडून दबाव, भाजप जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे कडून सत्तेचा दुरुपयोग !

आरोपी शितोळेला सोडून फिर्यादी मारकळ पाटीलला घेतले पोलिसांनी ताब्यात

छत्रपती संभाजीनगर, दि. २२ [प्रतिनिधी] :- छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला काळे फासल्याची कबुली देणाऱ्या भाजप जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी सत्तेचा दुरुपयोग करत त्यांचे हे घाणेरडे राजकारण उघडकीस आणणाऱ्या प्रवीण मारकळ पाटील यांना गुंडांकडून तसेच पोलिसांकडून त्रास देणे सुरू केले असल्याचे कळते.

याबाबत मीळालेल्या माहितीनुसार भाजप पादाधिकारी प्रवीण मारकळ पाटील यांनी दि. २७ डिसेंबर २०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला कोणीतरी काळे फासल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांना दिली होती. त्यावर शितोळे यांनी हे कृत्य आपणच केले असल्याची कबुली मारकळ पाटील ह्यांना व्हाटस-अप संदेश पाठवून दिली. शितोळे यांच्या या कृतीने धक्का बसलेल्या मारकळ पाटील ह्यांनी हा विषय पक्ष श्रेष्ठींच्या कानावर घातला.

मारकळ पाटील ह्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यावर पक्ष श्रेष्ठींनी मारकळ पाटील ह्यांना, “महानगरपालिका निवडणुका तोंडावर आहेत. सध्या शांत बसा. निवडणुका झाल्या की आपण कार्यवाही करू” असे सांगितले. त्यानुसार मारकळ पाटील यांनी काही दिवस ह्या विषयावर शांतता बाळगली. पण महानगरपालिका निवडणुका होताच त्यांनी हा विषय सामाजिक प्रसार माध्यामावर मांडला, पत्रकारांना कळविला, या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार असे करूनही शितोळे यांच्यावर पक्षाने कोणतीही कार्यवाही केली नाही. उलट त्यांनाच मारहाणीच्या, खोटे गुन्हे दाखल करून त्रास देण्याच्या धमक्या सुरू झाल्या. आज दि. २२, रविवार रोजी सकाळी ११.०० वाजेच्या सुमारास त्यांना सातारा पोलीस स्टेशन, छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी चौकशीसाठी म्हणून बोलावून घेतले. त्यांच्या विरुद्ध किशोर शितोळे यांनी पोलीस तक्रार दिली असून शितोळे यांच्या तक्रारी नुसार मारकळ पाटील यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगत त्यांना त्यांचा मोबाइल ताब्यात देण्याबाबत पोलिसांकडून दबाव टाकण्यात येत असल्याचे कळते.

हेही वाचा

लक्षवेधी