देवेंद्र फडणवीसांनी राज्याच्या राजकारणात शरद पवार आणि एकूणच महाविकास आघाडीला जो धोबीपछाड दिला आहे, त्यातून सावरण्यात उद्धव ठाकरेच काय शरद पवारही अपयशी ठरत आहेत. दोन दिवसांपूर्वी आलेल्या नगरपरिषद निवडणूक निकालातून हे सप्रमाण जाहीर झाले आहे. एवढेच नाहीतर या निवडणूक निकालांनी राज्यातील महानगपालिका निवडणूक निकाल ही स्पष्ट केले आहेत, निश्चित केले आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही…!
शरद पवारांची अवस्था तर आता अशी झाली आहे की, शरद पवारांना आता बहुजन समाज पक्षाचे राज्य सचिव काळुराम चौधरी ही पुरेसे झाले आहेत. महायुतीने नगरपरिषद निवडणूकात महाविकास आघाडीला पूर्णपणे नामोहरण केले. त्यात बारामती नगरपरिषदेच्या निवडणूक निकालांनी भर घातली. शरद पवार गटाचा बारामती नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेला. शरद पवार गटावर नाचक्कीची ही वेळ आणणारे नाव काळुराम चौधरी….!
काळुराम चौधरी हे बहुजन समाज पक्षाचे महाराष्ट्र महासचिव आहेत. मागील काही वर्षांपासून त्यांनी शरद पवारांच्या बारामतीतच शरद पवारांविरुद्ध शड्डू ठोकला आहे. चळवळीतून, संघर्षातून पुढे आलेले उच्चशिक्षित, प्रगल्भ काळुराम चौधरी पवार कुटुंबियांच्या प्रत्येक राजकीय कृतीचे अभ्यासपूर्ण विश्लेषण करून त्यावर भाष्य करत शरद पवारांच्या राजकीय बालेकिल्याला सुरुंग लावण्याचे काम करत आहेत.
ज्या बहुजन समाजासाठी ते हे करत आहेत, त्या बहुजन समाजाचा हवा तो भक्कम पाठिंबा मिळविण्यासाठी त्यांना अनेक परीक्षांना, अनेक संकटांना सामोरे जावे लागले. जनसामान्यांत विरोधकांविषयी बुद्धिभ्रम निर्माण करून विरोधकांना संपविण्यात हातखंडा असलेल्या शरद पवारांनी काळुराम चौधरींवर ही असेच अनेक विषारी प्रयोग केले. पण बहुजन समाजातून पुढे आलेल्या काळुराम चौधरींनी फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांच्या सामाजिक, राजकीय कार्यकर्त्यांची, नेत्यांची वीण वीनत शरद पवारांना बारामतीतच पिच्छाडीवर टाकले. यात त्यांना ईतर मागास वर्ग समाजाचे नेते प्राध्यापक लक्षमन हाके यांची ही साथ लाभली.
लोकसभा निवडणूक असो अथवा विधानसभा निवडणूक असो अथवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक असोत काळुराम चौधरी पवारांचे वाभाडे काढण्यात मागे राहत नाहीत. त्यांच्या याच लढवय्या, निर्भयी पणाने बहुजनांची विशेष एकजूट नसलेल्या, ताकद नसलेल्या बारामतीत बहुजन समाज एकवटत गेला. याच बहुजन समाजाच्या एकजुटीच्या बळावळ त्यांनी पवारांना शह देत नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत जवळपास सात हजार मते घेत शरद पवारांच्या उमेदवाराला मागे टाकले.
त्यांना या निवडणुकीत विजय खेचून आणता आला नसला तरी शरद पवारांचा पराभव करण्यात त्यांना यश आले. बारामतीच्या नगरपरिषद निवडणुकीत अजित पवारांनंतर त्यांचाच बोलबाला दिसून आला. त्यांच्या मुलीला या निवडणुकीत यश आले असून त्यांची मुलगी संघमित्रा काळुराम चौधरी यांच्या रूपाने राज्यातील बहुजन समाजाला आणखीन एक लढवय्ये युवा नेतृत्व मिळाले आहे. काळुराम चौधरी आणि त्यांच्या पक्षाला या निवडणुकीत आलेले यश राज्यात प्रस्थापितांविरुद्ध, भ्रष्टाचाऱ्यांविरुद्ध एकाकी झुंज देणाऱ्या नवोदितांसाठी प्रेरणादायक ठरणारे आहे.
ब्रह्मानंद चक्करवार….🖋️
