Monday, June 8, 2026
Homeप्रादेशिकमुनगंटीवारांच्या प्रयत्नातून कर्करोग बाधितांसाठी वेदनांच्या अंधारात फुलली विश्वासाची पहाट

मुनगंटीवारांच्या प्रयत्नातून कर्करोग बाधितांसाठी वेदनांच्या अंधारात फुलली विश्वासाची पहाट

मोहन भागवत यांच्या हस्ते पंडित दीनदयाल उपाध्याय कॅन्सर रुग्णालयाचे लोकार्पण

चंद्रपूर, दि. २२ [प्रतिनिधी] :- आज येथे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते पंडित दीनदयाल उपाध्याय कॅन्सर रुग्णालयाचे लोकार्पण झाले. आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्त्नातून साकारास आलेले अत्यंत आधुनिक उपचार पद्धतीचे, सोयी-सुविधांचे हे १४० खाटांचे कॅन्सर रुग्णालय म्हणजे पूर्व विदर्भातील कर्करोग बाधितांसाठी वेदनांच्या अंधारात फुललेली विश्वासाची पहाट होय, असे या कॅन्सर रुग्णालयाबाबत बोलल्या जात आहे.

तुलनात्मक दृष्ट्या विचार करता पूर्व विदर्भ म्हणजे महाराष्ट्र राज्याचा मागास भाग. त्यातल्या त्यात पूर्व विदर्भातील गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यात आरोग्या सारख्या मूलभूत सोयी-सुविधांचा अभाव. काही ठिकाणी ह्या सुविधा असल्यातरी आधुनिक उपचार पद्धती दुर्मिळ. याबाबीचा विचार करून माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केवळ चंद्रपूरच नाहीतर पूर्व विदर्भातील सर्व जनतेच्या हिताच्या दृष्टीने २०१६ पासून या रुग्णालयाच्या ऊभारणीसाठी स्वत:ला झोकून दिले होते. त्यांच्या अथक प्रयत्नातून साकारास आलेले हे कर्करोग रुग्णालय म्हणजे पूर्व विदर्भाच्या विकासासाठी, पूर्व विदर्भातील जनतेच्या सोयी-सुविधांसाठी माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आपले आयुष्य समर्पित केल्याचे प्रमाण होय, अशी चर्चा यानुषंगाने रंगत आहे.  

या कॅन्सर रुग्णालयाच्या लोकार्पणाने चंद्रपूरसह गडचिरोली, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यातील कर्करोग रुग्णांसाठी आशेच्या नव्या अध्यायाचा शुभारंभ झाला आहे. या रुग्णालयाच्या लोकार्पण क्षणी बोलतांना मुनगंटीवार यांनी, “माझ्या दीर्घकालीन प्रयत्नांना मूर्त स्वरूप मिळाले. ही भावना शब्दात मांडणे कठीण आहे. २०१६ पासून सातत्याने प्रयत्न करून साकारलेले हे २८० कोटींचे कॅन्सर रुग्णालय माननीय सरसंघचालकांच्या पावन हस्ते जनतेस अर्पण होताना पाहण्याचा क्षण माझ्या आयुष्यातील अत्यंत समाधानकारक, भावस्पर्शी आणि प्रेरणादायी ठरला आहे. कॅन्सर रुग्णांच्या सेवेसाठी ही १४० खाटांची भव्य-दिव्य रुग्णालयाची वास्तू जनतेच्या आरोग्यसेवेत दृढपणे उभी राहत आहे. चंद्रपूरच्या भूमीवर उभे राहिलेले पंडित दीनदयाल उपाध्याय कॅन्सर हॉस्पिटल हे केवळ उपचारांचे केंद्र नसून, रुग्णांना सुलभ, सन्मानपूर्वक आणि विश्वासार्ह उपचार मिळावेत या भावनेतून साकारलेले आशास्थान आहे. हा उपक्रम केवळ चंद्रपूरपुरता मर्यादित न राहता, संपूर्ण विदर्भातील हजारो कुटुंबांच्या आयुष्यात दिलासा, आत्मविश्वास आणि नवी उमेद निर्माण करणारा ठरेल, असा ठाम विश्वास आहे.” अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.

 

हेही वाचा

लक्षवेधी