Monday, June 8, 2026
Homeप्रादेशिकभाजपची घराणेशाही जनतेने संपविली !

भाजपची घराणेशाही जनतेने संपविली !

लोहा नगरपरिषद निवडणुकीत भाजपचा 'निकाल' लागला

नांदेड, दि. २१ [प्रतिनिधी] :- लोहा नगरपरिषद निवडणुकीत भाजपने उतरविलेल्या एकाच घरातील सहाच्या सहा उमेदवारांचा पराभव झाला आहे. “घराणेशाही म्हणजे देशाला लागलेला श्राप होय. घराणेशाही संपविली पाहिजे….” असे म्हणत कॉँग्रेस विरुद्ध रान उठविणाऱ्या भाजपनेच राजकारणात परत जी घराणेशाही सुरू केली ती घराणेशाही आता जनताच संपवेल, असा ईशारा या निवडणूक निकालाने भाजपला दिला असल्याची चर्चा आहे.

आज राज्यभरातील नगरपरिषद निवडणुकांचे निकाल आले. विदर्भासह मराठवाड्यातील काही नगरपरिषदांचे निवडणूक निकाल म्हणजे भाजपसाठी धोक्याची घंटा होय. नांदेड जिल्ह्यातील लोहा नगरपरिषद निवडणूक घराणेशाही च्या मुद्यामुळे राज्यभरात चर्चेचा विषय होती. मतदरांच्या मनाचा कानोसा न घेता भाजपने लादलेली घराणेशाही भाजपच्या अंगलट आली आणि या निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाला.

आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वात नियोजनबद्ध निवडणूक लढवत राष्ट्रवादी कॉँग्रेसने भाजपचा धुव्वा उडविला. भाजपने नगरसेवकपदासाठी गजानन सूर्यवंशी यांना उमेदवारी दिली होती. त्याच बरोबर त्यांच्या पत्नी गोदावरी सूर्यवंशी, भाऊ सचीन सूर्यवंशी, भावजय सुप्रिया सूर्यवंशी, मेव्हणा युवराज वाघमारे, भाच्याची पत्नी रिणा व्यवहारे या त्यांच्या नातेवाईकांना ही उमेदवारी दिली होती. यामुळे सामान्य मतदारांसह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यातही नाराजीची लाट उसळली.

मतदरांत उसळलेली ही लाट शांत करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री अतुल सावे यांच्या सभांचा भडिमार करण्यात आला. खासदार तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना तळ मांडून बसविण्यात आले. पण तरी लोहा नगरपरिषद निवडणुकीत मतदारांनी भाजपचा ‘निकाल’ लावलाच !

हेही वाचा

लक्षवेधी