छत्रपती संभाजीनगर, दि. ०४ [प्रतिनिधी] :- “तो प्रती पालकमंत्रीच आहे, पण तरी त्याचे पाय जमीनीवर आहेत. तो आज ही आमच्यात उठतो-बसतो, आमच्यासाठी अर्ध्या रात्री धावून येतो….मग त्याला नाहीतर काय धोंड्याला मतदान करायचं का…?” असे व्यक्त होत सातारा परिसराचा भाग असलेल्या प्रभाग क्रमांक २६ मधील मतदारांनी या प्रभागाचा नगरसेवक कोण असेल ते स्पष्ट केले.
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘कानोसा मतदारांच्या मनाचा….’ या कार्यक्रमा अंतर्गत विविध प्रभागातील मतदारांच्या नगरसेवकाकडून असलेल्या अपेक्षा, आधीच्या नगरसेवकाकडून झालेल्या उपेक्षा, निवडणूक रिंगणात उभ्या असलेल्या विविध उमेदवारांविषयीचे त्यांचे मत या विषयी चर्चा घडवून आणण्यात येत आहे.
त्याचाच भाग म्हणून आज दि. ०४, रविवार रोजी प्रभाग २६ मध्ये ‘जनजागृती’ च्या वतीने मतदारांचे चर्चा सत्र आयोजित करण्यात आले. या चर्चा सत्रात शिवसेनेचे अधिकृत उमेदवार रमेश बहूले यांच्या विषयी मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिक्रिया देत, “एखाद्या आमदार, खासदाराने, मंत्र्याने थोडं जवळ करायला उशीर, पक्षाचे एखादे पद द्यायला उशीर, गाडीची काच खाली करायला तयार नसतात काहीजण. पण प्रभाग क्रमांक २६ मधून ऊभे असलेले पालकमंत्री संजय शिरसाट यांचे अत्यंत विश्वासू रमेश रमेश बहूले हे सातारा-देवळाई परिसरात प्रती पालकमंत्री म्हणून ओळखल्या जातात. पालकमंत्र्यांच्या एवढ्या जवळ असूनही ते सामान्यातल्या-सामान्य कार्यकर्त्यांच्याच नव्हेतर सातारा-देवळाई परिसरातील कोणत्याही रहीवाशांच्या सुख-दुखात त्यांच्यासाठी ऊभे असतात. मंत्र्यांशी असलेल्या आपल्या जवळीकतेचा फायदा आपल्या स्वत:साठी करून घेण्या ऐवजी सामान्य माणसांसाठी करून घेण्याला ते अधिक महत्व देतात. म्हणूनच त्यांच्या प्रयत्नातून सातारा-देवळाई परिसराचा विकास होत आहे.”
या चर्चा सत्रात उत्स्फूर्तपणे भाग घेतांना एका भगिनीने, “विकासाची कास धरलेल्या कोणत्याही शहरात नव्याने वसणाऱ्या भागात रस्त्याच्या, पिण्याच्या पाण्याच्या, सांडपाण्याच्या व्यवस्थेच्या, पथदिव्यांच्या, आबालवृद्धांच्या सुरक्षेच्या, महिलांच्या सुरक्षेच्या भयाण समस्या असतात. या समस्यांचे राजकारण करणाऱ्यांची संख्या कमी नसते. पण या समस्यांकडे राजकारणा पूरते न पाहता या समस्या सोडविण्यासाठी समर्पित भावनेने झटणारा रमेश अण्णा बहूले सारखा एखादाच राजकारणी असतो. आज रमेश बहूले यांच्यामुळेच सातारा-देवळाई परिसरातील रहीवाशांच्या अनेक समस्यांचे निराकरण झाले आहे, होत आहे. त्यामुळेच आम्ही मतदार म्हणूनच नव्हेतर त्यांचे कार्यकर्ते म्हणून त्यांच्या विजयासाठी या निवडणुकीत सहभागी आहोत. त्यांचा विजय निश्चित आहे.” असे सांगितले.
एकूणच पश्चिम विधानसभा मतदार संघाचे आमदार म्हणून पालकमंत्री संजय शिरसाट यांनी सातारा-देवळाई परिसरात केलेले विकास कार्य, सातारा-देवळाई वासीयांच्या भावना लक्षात घेवून, त्यांच्या समस्या निराकरणासाठी या भागातील सामाजिक कार्यकर्ते, शिवसेनेचे पदाधिकारी रमेश अण्णा बहूले यांनी केलेले कार्य, त्यांनी सर्वसामान्यांशी ठेवलेले आपुलकीचे नाते यामुळे प्रभाग क्रमांक २६ मधील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार रमेश अण्णा बहूले यांच्यासह सातारा-देवळाई परिसरातील शिवसेनेच्या ईतरही उमेदवारांचा विजय या निवडणुकीत निश्चित समजण्यात येत आहे.
