Monday, June 8, 2026
Homeराजकीयज्यांनी शेन खाल्ल, त्यांच्यावर कारवाई होणार-राऊत

ज्यांनी शेन खाल्ल, त्यांच्यावर कारवाई होणार-राऊत

मुंबई, दि. १३ [प्रतिनिधी] :- चंद्रपूर महानगरपालिकेत सत्ता स्थापनेसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे [उबाठा] पक्षाने भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिल्याने ‘उबाठा’ आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना [मनसे] मध्ये ठिणगी पडली असून या विषयावर माध्यमांशी बोलतांना ‘उबाठा’ प्रवक्ते संजय राऊत यांनी, “चंद्रपूरात ज्यांनी शेन खाल्ल असेल, त्यांच्यावर कारवाई होणार” अशा रोखठोक शब्दांत प्रतिक्रिया दिली.

तसेच चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत ‘उबाठा’ ने भाजप ला दिलेल्या पाठिंब्यावरुन उद्धव ठाकरे यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडणाऱ्या मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे यांचा ही चांगलाच समाचार राऊत यांनी यावेळी घेतला. “चंद्रपूर मध्ये भाजपला पाठिंबा देण्यासाठी ‘उबाठा’ नगरसेवकांनी प्रत्येकी एक-एक कोटी रुपये घेतले” असा आरोप संदीप देशपांडे यांनी केला होता. त्यावर व्यक्त होतांना राऊत यांनी, “आमच्या नगरसेवकांनी एक-एक कोटी घेतले म्हणणारे काय पैसे मोजायला तिथे गेले होते का? त्यांचे काही कमिशन ठरले होते का?” अशी जळजळीत टिका केली.

 

हेही वाचा

लक्षवेधी